Followers

Friday, 17 April 2020

थोरले बाजीराव

थोरले बाजीराव यांना पेशवेपदाची वस्त्रे मिळाली,त्या घटनेला आज 300 वर्ष पूर्ण होत आहे. संपूर्ण हिंदुस्थानवर मराठ्यांचे राज्य निर्माण करणारे बाजीराव हे कुशल सेनानी आणि मुत्सद्दी होते.
पालखेडच्या लढाईत निजामाचा पराभव, मोहम्मदखान बंगशचा पराभव आणि दिल्लीवर पहिली स्वारी करुन शिवछत्रपतींची स्वप्नपुर्ती करणारा पहिला मराठा म्हणजे बाजीराव पेशवा!!
उदयपूरमधील प्रसंग!! बाजीराव उदयपूरला गेले,तेव्हा तेथील महाराणांनी उत्तम स्वागताची तयारी केली.राजसिंहासनाच्या बाजुला तेवढ्याच उंचीचे सिंहासन बाजीरावांसाठी बनवले गेले. बाजीराव दरबारात आले, सर्वांनी जयजयकार केला, महाराणा त्यांना सामोरे गेले आणि शेजारी बसण्याची विनंती केली पण बाजीराव मात्र सिंहासनावर न बसता पायरीवर बसले तेव्हा महाराणा म्हणाले"बाजीरावजी, "क्या हमसे कोई गलती हूई है ,कृपया सिंहासन पर विराजिये!" बाजीराव नम्रतापूर्वक म्हणाले "जी नही महाराज, यह सिंहासन महाराणा प्रताप का सिंहासन है, इसके साथ बैठने की मेरी योग्यता नही है,यह योग्यता तो केवल आपकी और छत्रपती शाहूमहाराज की है,मै तो केवल छत्रपती का एक तुच्छ सेवक हूॅं!!" बाजीरावांच्या शब्दांनी त्यांची कीर्ती आणि आदर अजूनच वाढला.
येथून पुढचा प्रवास जयपुरकडे होता....तिथेही अंबरनरेश बाजीरावांच्या स्वागताची तयारी करत होते.....तिथेही उदयपूरप्रमाणेच दोन सिंहासन!! दरबारात मोठा सोहळा झाला.....मात्र इथे बाजीराव पायरीवर न बसता थेट सिंहासनावर जाऊन बसले.....सोहळा संपला, सोबतच्यां लोकांना संभ्रम झाला की उदयपूर आणि जयपुरला बाजीरावांनी वेगवेगळा व्यवहार का केला असेल? बाजीरावांनी त्यांना उत्तर दिले "उदयपूर अर्थात मेवाड हे महाराणा प्रतापांच्या स्वाभिमानाचे प्रतिक आहे,ज्यांनी कधीही मुघलांसमोर मान झुकवली नाही ,त्या गादीचा भक्तीभावाने आदर राखलाच पाहिजे,पण हे अंबरचे रजपुत राजे! यांनी आपल्या मुली मुघलांना दिल्या,यांचा काय सन्मान करायचा? मेवाड ते मेवाडच!!
अशा प्रतापसूर्य बाजीरावांना छत्रपती थोरल्या शाहूमहाराजांनी मराठा साम्राज्याचा पेशवा म्हणून नियुक्त केले....त्या घटनेला आज तीनशे वर्ष वर्ष पूर्ण होत आहे.
श्री शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याला हिंदवी साम्राज्याकडे घेऊन जाणार्या प्रतापसूर्य बाजीरावांना विनम्र अभिवादन!

No comments:

Post a Comment