Followers

Friday, 17 April 2020

चापेकर बंधू हे आद्यक्रांतिकारी

चापेकर बंधू हे आद्यक्रांतिकारी होते. त्यांच्या मध्ये दामोदर हरी चापेकर सर्वात थोरले, यांचा जन्म २५ जून १८६९ आणि त्यांना वीरमरण आले तो दिवस म्हणजे १८ एप्रिल १८९८.
१९व्या शतका अखेरीस पुण्यात प्लेगने थैमान घातले. प्लेगला आळा घालण्याच्या निमित्ताने विल्यम चार्ल्स रॅन्ड या बिटिश अधिकाऱ्याने लोकांचा छळ केला. हिंदूंची घरे उपसून जाळणे, देवघरात जाऊन देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली महिलांशी अभद्र वर्तन करणे, कर्त्या पुरुषांना नामर्दा प्रमाणे हीन वागवणे अशा त्याच्या क्रूर आणि अमानवी कृत्यांमुळे समाजाच्या सर्वच थरांमध्ये संतापाची लाट उसळली. सूडाची ठिणगी मनात पडली आणि धगधगू लागली होती.
राष्ट्र आणि धर्म प्रेमाच्या या जाज्ज्वल्य भावनेतूनच चापेकर बंधू रँडच्या विरोधात पेटून उठले आणि २२ जून १८९७ ला रँडवर पाळत ठेवून चापेकर बंधूं पैकी दामोदरने त्याच्यावर गोळी झाडली. २५ जूनला रँडचा मृत्यू झाला.
अश्या या थोर पराक्रमी बंधू पैकी दामोदर हरी चापेकर यांचा आज स्मृती दिन....
त्यांना विनम्र अभिवादन

No comments:

Post a Comment